Jonathan Livingston Seagull -Book Summary जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल

जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल हा एक समुद्रपक्षी होता. तो त्याच्या आईवडिलांसोबत व इतर पक्ष्यांसोबत समूहामध्ये राहत असे. परंतु तो इतर पक्ष्यांसारखा अजिबात नव्हता ज्या वेळेस इतर पक्षी अन्नपाण्यासाठी उडत, जोनाथन त्यातला आनंद घेत. त्याच्यासाठी उडणं म्हणजे निखळ आनंदानं भरलेल्या समुद्रात डुबकी मारण्यासारखं होतं.  प्रत्येक वेळेस उडतांना तो अधिकाधिक वेगाने उडण्याचा उडतांना नवनवीन पद्धती शोधण्याचा प्रयत्न करत.  कधीकधी त्याला अपयश येई पण तो कधीही हार मानात नसे . इतर पक्ष्यांसारखं फक्त अन्नपाण्यासाठी जगणं त्याला मान्य नव्हतं. परंतु ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना मान्य नव्हती. त्यांना वाटे जोनाथननं इतरांसारखाच जगलं पाहिजे.

book summary jonathan livingston seagull
  • Save
jonathan livingston seagull

एकदा जोनाथन उडण्याचा सराव करत होता. हळूहळू त्यानं गती वाढवली त्याचबरोबर तो आता आठ हजार फूट उंचीवर पोहचला होता व त्याची गती दोनशे मैल झाली होती हा एकप्रकारचा विक्रमच होता. तो या विक्रमाबद्दल इतरांना सांगण्यासाठी आला. परंतु इतर पक्ष्यांना हि गोष्ट मान्य नव्हती व त्याने समुद्रपक्ष्यांची परंपरा मोडल्याबद्दल त्याला समुहामधून काढून टाकण्यात आलं.

जोनाथनला वाईट वाटलं पण त्यानं उडण्याचा सर्व सोडला नाही. तो वेगवान वाऱ्यावर स्वार होऊन नवनवीन पद्धती शिकत होता, अधिकाधिक उंचीवर जात होता. असंच एकदा उंच उडत असतांना त्याला दोन पक्षी त्याच्याइतक्याच वेगाने त्याच्या बाजूने उडतांना दिसले. जोनाथन त्यांच्याकडे बघून प्रभावित झाला. त्या दोघांनी जोनाथनला अजून उंच उडण्यास सांगितलं, ते त्याच्या बरोबरीनं उडू लागले. त्यांनी प्रत्येक मर्यादा ओलांडली होती.

book summary jonathan livingston seagull
  • Save
jonathan livingston seagull

ते ज्या ठिकाणी आले ते ठिकाण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्ग होत कारण जोनाथानसाठी कामात निपुण होणं म्हणजेच स्वर्गाला गवसणी घालण्यासारखं होत. या ठिकाणचे सर्व पक्षी हे उडण्याची आवड असलेले किंबहुना उडण्यासाठीच जगणारे होते. या नवीन साथीदारांबरोबर जोनाथन मनसोक्त उडत होता इथे आल्यावर जोनाथनला लक्षात आलं कि शिकण्यासारखं अजून खूप काही आहे. जोनाथनला एक वयस्कर पक्षी भेटला त्याच नाव होत चियांग.

चियांगच्या मदतीने जोनाथनने प्रचंड मेहनत करून त्याच्या उडण्यामध्ये अजून पारंगतता झाला त्याच्या मनात विचार आला ” जोनाथन आता शिकण्याला आणि आवडीचं काम करायला कुठलीच मर्यादा राहिलेली नाही. जोनाथन वापस पृथ्वीवर आला तो आता इतर बहिष्कृत केलेल्या पक्षांना शिकवणार होता.

कथेचा सार :- जोनाथन हा प्रत्येक माणसामध्ये आहे. आपल्या मर्यादांना न जुमानता आपल्या आवडीच्या कामामध्ये निपुणता मिळवणं यातच खरं यश आहे.

4 thoughts on “Jonathan Livingston Seagull -Book Summary जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *