The Alchemist- Book Summary द अल्केमिस्ट

एका संध्याकाळी, सॅन्तियागो त्याच्या मेंढ्या घेऊन एका उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली  मुक्कामासाठी आला. त्याने मेंढ्यांना बांधलं आणि त्याच्यासोबत असलेलं जाडजूड पुस्तक डोक्याखाली घेऊन झोपी गेला. त्या रात्रीही त्याला तेच स्वप्न पडलं, जे एक आठवड्यापूर्वी त्याच झाडाखाली पडलं होतं. स्वप्नात त्याला एका लहान मुलिनं त्याचा हात पकडून इजिप्तमधल्या पिरॅमिड्स समोर आणलं आणि ती त्याला सांगू लागली कि इथेच त्याला खजिना सापडेल.
alchemist summary
  • Save
the alchemist

सॅन्तियागोला अंदालुझियाना मध्ये येऊन दोन वर्ष झाली होती. एवढ्यात त्याला तिथली प्रत्येक शहरं, गावं  माहित झाली होती. त्याच्या लक्षात आलं की तरीफा गावात स्वप्नांचा अर्थ सांगणारी एक म्हातारी राहते, तो तिच्याकडे गेला. तिनं त्याला त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा सल्ला दिला.

पुढे तो एका चौकात त्याच पुस्तक बदलण्यासाठी आलेला असतांना त्याला एक म्हातारा भेटला. तो सॅन्तियागोचं  मन ओळखु शकत होता. त्यानं त्याच स्वप्न वाचलं. म्हाताऱ्याने त्याला सांगितलं की खजिन्याचा शोध घेण्याकरता त्यानं शकुनांचा पाठलाग केला पाहीजे, ती समजून त्यांचा अर्थ लावला पाहिजे विश्वाच्या अंतरात्म्यात अशी एक   शक्ती आहे जी प्रत्येकाला त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करते. म्हाताऱ्याने त्याला शकुनांचा अर्थ लावण्यासाठी मदत करणारे दोन खडे दिले.

सॅन्तियागोनं पिरॅमिड्सकडे जाण्याचं पक्क केलं. त्यानं मेंढया विकून पैसे केले व आफ्रिकेची तिकिटं काढली, तो दोन तासांतच अफ्रिकेतल्या टँजिअर शहरात आला. परंतु त्याला तिथली भाषा येत नव्हती आणि याचाच  गैरफायदा एका चोराने घेतला व सर्व पैसे हडपले. तो हताश झाला स्वप्नाचा पाठलाग करता करता त्याच्याकडे जेवढं होत ते पण त्यानं गमावलं होत.

दुसऱ्या दिवशी शहरातून फिरत असताना उंच टेकडीवर एक काचसामानाचं दुकान होत. दुकानदाराला स्पॅनिश येत होती, त्यानं काही मेंढ्या विकत घेऊन परत जाण्यासाठी पैसे गोळा करण्याचं ठरवलं. तो तिथं काम करू लागला. जवळपास एक वर्षानंतर मुलाकडे पुरेसे पैसे जमा झाले. पण तो जेव्हा वापस जायला निघाला त्याचा अंगारखातून ते म्हाताऱ्याने  दिलेले दोन खडे खाली पडले. त्याला खजिन्या ची आठवण झाली. त्याने थोडा विचार केला. आता त्याच्याकडे इजिप्तला जाण्याइतपत पैसे होते तसेच तो शकुनांचा अर्थ लावण्यासही शिकला होता व आयुष्यात हि संधी पुनः भेटणार नव्हती. त्याने पिरॅमिड्स च्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला.

पिरॅमिड्सपर्यंत जाण्यासाठी त्याला वाळवंट ओलांडन गरजेचं होत. अल फायूम म्हणजेच मरुद्यान हे इजिप्तच्या वाटेत लागणारं एक ठिकाण होत. एक समूह त्याच दिशेने निघाला होता. सॅन्तियागो सुद्धा त्यांच्यासोबत निघाला. सोबतीला त्याला एक इंग्लिश माणूस भेटला तो किमयागाराच्या ( alchemist ) शोधात निघाला होता. त्यांचा प्रवास सुरु झाला, सॅन्तियागो वाळवंटाचं बारीक निरीक्षण करू लागला काही दिवसांच्या प्रवासानंतर ते मरूद्यानात पोहचले. याचदरम्यान वाळवंटात दोन जमातीदरम्यान युद्ध चालू होत. त्यामुळे त्याला तिथंच थांबणं गरजेचं होतं कारण मरूद्यान हे तठस्थतेचं ठिकाण होत. मरूद्यानावर कोणीही हल्ला करत नसे.

परंतु काही शकुनांचा अर्थ लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कि मरूद्यानावर हल्ला होणार आहे. त्यानं हि गोष्ट तिथल्या सैनिकप्रमुखाला सांगितली. दुसऱ्या दिवशी खरंच मरूद्यानावर हल्ला झाला. सान्तियागोने दिलेल्या पूर्वसूचनेमुळे त्यांनी तो परतवून लावला. तिथल्या प्रमुखांनी बक्षीस म्हणून त्याला पन्नास सुवर्णमुद्रा दिल्या. एक सामान्य मुलगा शकुनांचा अर्थ लावून युद्धाची पूर्वसूचना देऊ शकतो हि गोष्ट ऐकून प्रत्यक्ष किमयागारच त्याला भेटण्यासाठी आला. पुढच्या प्रवासात त्यानं सॅन्तियागो मदत करण्याचं ठरवलं.

वाळवंटात चालू असलेलं दोन जमतीदरम्यानच युद्ध अजूनही संपलेलं नव्हतं. तरीसुद्धा सॅन्तियागो व किमयागार पिरॅमिडच्या दिशेने निघाले. एक महिन्यांच्या प्रवासानंतर ते एका आश्रमात थांबले. यादरम्यान कधी शकुनांचा उपयोग करून, कधी जवळ असलेल्या पैशांचा उपयोग करून त्यांनी स्वतःचा बचाव केला होता. आश्रमापासून पिरॅमिड्स फक्त तीन तासांच्या अंतरावर होते. इथून पुढचा प्रवास सॅन्तियागो एकटाच करणार होता.

आश्रमामध्ये किमयागाराने त्याच्याजवळ असलेल्या पॅरिसचा उपयोग करून सोन तयार केलं व त्यातला एक हिस्सा मुलाला दिला, एक स्वतः जवळ परतीच्या प्रवासासाठी ठेवला व उरलेले दोन हिस्से  ( यातला एक हिस्सा सान्तियागोला अडचणीच्या वेळेस देण्यासाठी ) आश्रमातल्या माणसाजवळ दिले व तो वापस दिशेने निघाला.

सॅन्तियागो पिरॅमिड्सच्या दिशेने निघाला. काही वेळानंतर त्याला वाळूची टेकडी दिसली, जसं तो टेकडी चढू लागला तसं त्याच्या मनातून आवाज आला, ” जिथं तुझ्या डोळ्यातुन अश्रु येतील, त्या जागेवर खजिना सापडेल“. जेव्हा तो टेकडीच्या टोकावर पोहोचला समोर त्याला पिरॅमिड्स दिसले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, जिथं अश्रुंचे थेंब, ती जागा खोदायला त्यानं सुरुवात केली.

काही तास उलटले तरी त्याला खजिना सापडत नव्हता, तेवढ्यात त्याला पावलांचा आवाज आला, दोन माणसं त्याच्या जवळ आली,  त्यांनी त्याची पिशवी बघितली त्यात किमयागारानं  दिलेलं सोन होतं. त्यांना वाटलं  हे सोनं तो या खड्ड्यात लपवत आहे. त्यांनी त्याला अजून खनायला सांगितल. शेवटी काहीच  सापडलं नाही. ते त्याला  मारू लागले. मृत्यू समोर दिसताच सॅन्तियागो त्यांना त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. शेवटी ते निघून जात असताना त्यातल्या एकानं त्यालाही असंच स्वप्न पडल्याचं सांगितलं, स्वप्नात त्याला  उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली खजिना असल्याचं दिसलं होतं. ते दोघे निघून गेले आणि सान्तियागोला खजिना कुठ आहे हे समजलं.

सॅन्तियागो अंदालुझियाना मध्ये त्या उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली आला. त्यानं खणायला सुरुवात केली, थोड्याच वेळात त्याला एक टनक वस्तू लागली, ती खजिन्याने भरलेली पेटी होती.

Shivaji The Management Guru Book Summary शिवाजी द मॅनेजमेंट गुरू

‘शिवाजी द मॅनेजमेंट गुरू’ shivaji the management guru या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांना व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून आपल्यासमोर उलगडलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपण एक यशस्वी योद्धा, राजा म्हणून ओळखतो. परंतु शिवाजी महाराज एक यशस्वी राजा होण्यासाठी जे मूलभूत गुण जबाबदार होते ते म्हणजे व्यवस्थापन आणि प्रभावी नेतृत्व. नामदेवराव जाधव यांनी त्यांच्या आणि मी या पुस्तकाची summary आपल्यासमोर घेऊन आलोय. चला तर मग सुरू करूया!!
shivaji the management guru book summary
  • Save
shivaji the management guru

मॅनेजमेंट म्हणजे काय? What is Management?

Management is a art of getting things done through people, मॅनेजमेंट म्हणजे लोकांकडून काम करून घेण्याची कला. ही व्याख्या Mary Parker Follet या मॅनेजमेंट तज्ञाने 19 व्या शतकात केलेली आहे परंतु ती शिवाजी महाराजांनी दोनशे वर्षपूर्वीच अष्टप्रधान मंडळ बनवून, लष्कर बनवून अमलात आणलेली होती आणि त्याचा वापर करून स्वराज्य स्थापन केलं होतं म्हणजे शिवाजी महाराज हेच मॅनेजमेंटचे गुरू ठरतात.
 

व्यवस्थापन एक कला

व्यवस्थापन ही एक कला आहे कारण प्रत्येक नवीन प्रश्नाला नवीन उत्तर शोधावं लागतं. महाराजांच्या नेतृत्वात त्यांच्या मावळ्यांनी ही कला चांगलीच आत्मसात केले होती. उदा. पन्हाळ्यातुन, आग्र्यातून महाराजांची सुटका, अफझलखानाचा वध, सुरत, बुऱ्हाणपूर मोहीम आणि अशा कितीतरी प्रसंगांमध्ये महाराजांनी नवनवीन क्लृप्त्या वापरून शत्रूंचा सामना केला आहे.

शिवाजी महाराज आणि मॅनेजमेंटची 14 तत्वे

1916 मध्ये हेन्री फयॉल या व्यवस्थापन तज्ञाने त्यांच्या एका पुस्तकात व्यवस्थापनाच्या 14 रत्नांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या मते कोणत्याही संस्थेला यशस्वी होण्यासाठी या 14 रत्नांचा उपयोग होतो. परंतु शिवाजी महाराजांनी ती 250 वर्षपूर्वीच प्रत्यक्षात अमलात आणली होती.
  1. Division of work शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ तयार केलं होतं आणि प्रत्येकाला कामं ठरवून दिली. शिवाजी महाराज फक्त अत्यंत महत्वाची कामे करत जसं की अफझलखानाचा वध, सुरतेची मोहीम इत्यादी.
  2. Authority and resposibility शिवाजी महाराजांनी मंत्र्यांना ज्या प्रमाणात अधिकार दिले त्याच प्रमाणात जबाबदारी सुद्धा दिली. उदा. महाराजांनी सेनापतीला युद्धाचे अधिकार दिले त्याच प्रमाणात युद्धाच्या यशापयशासाठी त्याला जबाबदार धरण्याची व्यवस्थाही केली.
  3. Discipline शिवाजी महाराज स्वतः खूप शिस्तप्रिय होते आणि तशीच शिस्त त्यांनी अधिकाऱ्यांना सुद्धा लावली. शिवाजी महाराजांनी स्वराज्यसाठी कडक नियम तयार केले होते आणि त्यातलाच एक नियम असा की सूर्यास्तानंतर कुठल्याही किल्ल्याचा दरवाजा सूर्योदय होईपर्यंत उघडला जाऊ नये.
  4. मिर्झाराजेंशी तह केल्यानंतर महाराजांना औरंगजेबाला भेटण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. आपण दूर गेल्यानंतर नियमांचे पालन होते की नाही हे बघण्यासाठी ते स्वतः एका रात्री किल्ल्याच्या दरवाज्याजवळ येऊन पोहचले आणि किल्लेदाराला दरवाजा उघडण्याचा आदेश दिला परंतु किल्लेदाराने स्वराज्याचा नियम पाळला आणि सकाळ होईपर्यंत दरवाजा उघडला नाही त्यावर महाराजांनी त्या किल्लेदाराला नियम पाळल्याबद्दल शाबासकी दिली. यावरून हेच लक्षात येतं की स्वराज्यामध्ये शिस्तीला किती महत्त्व होत.
  5.  Unity of command स्वराज्यात प्रत्येक मंत्र्याला त्याच्या खात्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता परंतु त्याला तो आदेश काढण्यापूर्वी महाराजांची परवानगी घ्यावी लागे.

अशाच इतर 10 तत्वांचा वापर करून महाराजांनी स्वराज्य वाढविले.

महाराजांचे लष्कर व्यवस्थापन, महाराजांची संदेशवहन क्षेत्रातील क्रांती, महाराजांच्या प्रत्येक मोहिमांमागचे नियोजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर अनेक व्यवस्थापनांबद्दल माहिती या पुस्तकातून वाचायला मिळेल. प्रत्येकाने एकदा तरी वाचावं असं हे पुस्तक आहे.
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap