The Alchemist- Book Summary द अल्केमिस्ट

एका संध्याकाळी, सॅन्तियागो त्याच्या मेंढ्या घेऊन एका उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली  मुक्कामासाठी आला. त्याने मेंढ्यांना बांधलं आणि त्याच्यासोबत असलेलं जाडजूड पुस्तक डोक्याखाली घेऊन झोपी गेला. त्या रात्रीही त्याला तेच स्वप्न पडलं, जे एक आठवड्यापूर्वी त्याच झाडाखाली पडलं होतं. स्वप्नात त्याला एका लहान मुलिनं त्याचा हात पकडून इजिप्तमधल्या पिरॅमिड्स समोर आणलं आणि ती त्याला सांगू लागली कि इथेच त्याला खजिना सापडेल.
alchemist summary
the alchemist

सॅन्तियागोला अंदालुझियाना मध्ये येऊन दोन वर्ष झाली होती. एवढ्यात त्याला तिथली प्रत्येक शहरं, गावं  माहित झाली होती. त्याच्या लक्षात आलं की तरीफा गावात स्वप्नांचा अर्थ सांगणारी एक म्हातारी राहते, तो तिच्याकडे गेला. तिनं त्याला त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्याचा सल्ला दिला.

पुढे तो एका चौकात त्याच पुस्तक बदलण्यासाठी आलेला असतांना त्याला एक म्हातारा भेटला. तो सॅन्तियागोचं  मन ओळखु शकत होता. त्यानं त्याच स्वप्न वाचलं. म्हाताऱ्याने त्याला सांगितलं की खजिन्याचा शोध घेण्याकरता त्यानं शकुनांचा पाठलाग केला पाहीजे, ती समजून त्यांचा अर्थ लावला पाहिजे विश्वाच्या अंतरात्म्यात अशी एक   शक्ती आहे जी प्रत्येकाला त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करते. म्हाताऱ्याने त्याला शकुनांचा अर्थ लावण्यासाठी मदत करणारे दोन खडे दिले.

सॅन्तियागोनं पिरॅमिड्सकडे जाण्याचं पक्क केलं. त्यानं मेंढया विकून पैसे केले व आफ्रिकेची तिकिटं काढली, तो दोन तासांतच अफ्रिकेतल्या टँजिअर शहरात आला. परंतु त्याला तिथली भाषा येत नव्हती आणि याचाच  गैरफायदा एका चोराने घेतला व सर्व पैसे हडपले. तो हताश झाला स्वप्नाचा पाठलाग करता करता त्याच्याकडे जेवढं होत ते पण त्यानं गमावलं होत.

दुसऱ्या दिवशी शहरातून फिरत असताना उंच टेकडीवर एक काचसामानाचं दुकान होत. दुकानदाराला स्पॅनिश येत होती, त्यानं काही मेंढ्या विकत घेऊन परत जाण्यासाठी पैसे गोळा करण्याचं ठरवलं. तो तिथं काम करू लागला. जवळपास एक वर्षानंतर मुलाकडे पुरेसे पैसे जमा झाले. पण तो जेव्हा वापस जायला निघाला त्याचा अंगारखातून ते म्हाताऱ्याने  दिलेले दोन खडे खाली पडले. त्याला खजिन्या ची आठवण झाली. त्याने थोडा विचार केला. आता त्याच्याकडे इजिप्तला जाण्याइतपत पैसे होते तसेच तो शकुनांचा अर्थ लावण्यासही शिकला होता व आयुष्यात हि संधी पुनः भेटणार नव्हती. त्याने पिरॅमिड्स च्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला.

पिरॅमिड्सपर्यंत जाण्यासाठी त्याला वाळवंट ओलांडन गरजेचं होत. अल फायूम म्हणजेच मरुद्यान हे इजिप्तच्या वाटेत लागणारं एक ठिकाण होत. एक समूह त्याच दिशेने निघाला होता. सॅन्तियागो सुद्धा त्यांच्यासोबत निघाला. सोबतीला त्याला एक इंग्लिश माणूस भेटला तो किमयागाराच्या ( alchemist ) शोधात निघाला होता. त्यांचा प्रवास सुरु झाला, सॅन्तियागो वाळवंटाचं बारीक निरीक्षण करू लागला काही दिवसांच्या प्रवासानंतर ते मरूद्यानात पोहचले. याचदरम्यान वाळवंटात दोन जमातीदरम्यान युद्ध चालू होत. त्यामुळे त्याला तिथंच थांबणं गरजेचं होतं कारण मरूद्यान हे तठस्थतेचं ठिकाण होत. मरूद्यानावर कोणीही हल्ला करत नसे.

परंतु काही शकुनांचा अर्थ लावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कि मरूद्यानावर हल्ला होणार आहे. त्यानं हि गोष्ट तिथल्या सैनिकप्रमुखाला सांगितली. दुसऱ्या दिवशी खरंच मरूद्यानावर हल्ला झाला. सान्तियागोने दिलेल्या पूर्वसूचनेमुळे त्यांनी तो परतवून लावला. तिथल्या प्रमुखांनी बक्षीस म्हणून त्याला पन्नास सुवर्णमुद्रा दिल्या. एक सामान्य मुलगा शकुनांचा अर्थ लावून युद्धाची पूर्वसूचना देऊ शकतो हि गोष्ट ऐकून प्रत्यक्ष किमयागारच त्याला भेटण्यासाठी आला. पुढच्या प्रवासात त्यानं सॅन्तियागो मदत करण्याचं ठरवलं.

वाळवंटात चालू असलेलं दोन जमतीदरम्यानच युद्ध अजूनही संपलेलं नव्हतं. तरीसुद्धा सॅन्तियागो व किमयागार पिरॅमिडच्या दिशेने निघाले. एक महिन्यांच्या प्रवासानंतर ते एका आश्रमात थांबले. यादरम्यान कधी शकुनांचा उपयोग करून, कधी जवळ असलेल्या पैशांचा उपयोग करून त्यांनी स्वतःचा बचाव केला होता. आश्रमापासून पिरॅमिड्स फक्त तीन तासांच्या अंतरावर होते. इथून पुढचा प्रवास सॅन्तियागो एकटाच करणार होता.

आश्रमामध्ये किमयागाराने त्याच्याजवळ असलेल्या पॅरिसचा उपयोग करून सोन तयार केलं व त्यातला एक हिस्सा मुलाला दिला, एक स्वतः जवळ परतीच्या प्रवासासाठी ठेवला व उरलेले दोन हिस्से  ( यातला एक हिस्सा सान्तियागोला अडचणीच्या वेळेस देण्यासाठी ) आश्रमातल्या माणसाजवळ दिले व तो वापस दिशेने निघाला.

सॅन्तियागो पिरॅमिड्सच्या दिशेने निघाला. काही वेळानंतर त्याला वाळूची टेकडी दिसली, जसं तो टेकडी चढू लागला तसं त्याच्या मनातून आवाज आला, ” जिथं तुझ्या डोळ्यातुन अश्रु येतील, त्या जागेवर खजिना सापडेल“. जेव्हा तो टेकडीच्या टोकावर पोहोचला समोर त्याला पिरॅमिड्स दिसले. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले, जिथं अश्रुंचे थेंब, ती जागा खोदायला त्यानं सुरुवात केली.

काही तास उलटले तरी त्याला खजिना सापडत नव्हता, तेवढ्यात त्याला पावलांचा आवाज आला, दोन माणसं त्याच्या जवळ आली,  त्यांनी त्याची पिशवी बघितली त्यात किमयागारानं  दिलेलं सोन होतं. त्यांना वाटलं  हे सोनं तो या खड्ड्यात लपवत आहे. त्यांनी त्याला अजून खनायला सांगितल. शेवटी काहीच  सापडलं नाही. ते त्याला  मारू लागले. मृत्यू समोर दिसताच सॅन्तियागो त्यांना त्याच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. शेवटी ते निघून जात असताना त्यातल्या एकानं त्यालाही असंच स्वप्न पडल्याचं सांगितलं, स्वप्नात त्याला उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली खजिना असल्याचं दिसलं होतं. ते दोघे निघून गेले आणि सान्तियागोला खजिना कुठ आहे हे समजलं.

सॅन्तियागो अंदालुझियाना मध्ये त्या उद्ध्वस्थ चर्चसमोर असलेल्या सायकामोर झाडाखाली आला. त्यानं खणायला सुरुवात केली, थोड्याच वेळात त्याला एक टनक वस्तू लागली, ती खजिन्याने भरलेली पेटी होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *